1 Chronicles 27:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे: अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाच्या भांडारावर अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा होता; आणि शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या व किल्ल्यातल्या भांडारांवर उज्जीयाचा पुत्र योनाथान हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अदिएलाचा पुत्र अजमावेथ राजाचा भांडारपाल होता. उज्जीयाहचा पुत्र योनाथान इस्राएलातील सर्व सीमापार नगरे, गावे आणि किल्ले यांचा विभागीय भांडारपाल होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.