1 Chronicles 27:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलचा तुकडीत 24,000 जण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.