1 Chronicles 28:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशांचे सरदार, राजाची पाळीपाळीने सेवा करणार्‍या तुकड्यांचे सरदार होते; तसेच सहस्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या संपत्ती व पशुधनावर देखरेख करणारे सरदार आणि शूर वीर ह्या सर्वांना दाविदाने यरुशलेम येथे जमवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्‍यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले.