1 Chronicles 28:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दाविदाने आपला पुत्र शलमोन ह्याला मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यांवरील कोठड्या व दयासनाचे स्थान ह्यांचा नमुना दिला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.