1 Chronicles 28:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याच्या दीपमाळा व त्यांची सोन्याची चाडी; प्रत्येक दीपमाळ व तिची चाडी ह्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे चांदी तोलून दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.