1 Chronicles 28:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले, आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.