1 Chronicles 28:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.