1 Chronicles 28:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता सर्व इस्राएलांसमक्ष, परमेश्वराच्या मंडळीसमक्ष, आमच्या देवाच्या विद्यमाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवून त्या पाळा म्हणजे तुम्ही ह्या उत्तम देशाचे मालक व्हाल व आपल्यामागे आपल्या मुलांना हा देश कायमचे वतन ठेवून जाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.