1 Chronicles 29:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा या भूतलावरचे तात्पुरते प्रवासी आहोत. आमचे अस्तित्व ओझरत्या सावलीसारखे. ते थांबवणे आमच्या हाती नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही.