1 Chronicles 29:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पण केले; त्यांनी एक हजार बैल, एक हजार एडके व एक हजार कोकरे पेयार्पणांसहित अर्पून सर्व इस्राएलासाठी विपुल यज्ञ केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.