1 Chronicles 29:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले.