1 Chronicles 29:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे.