1 Chronicles 4:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजांतल्या पाचशे पुरुषांनी ईशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जीएल ह्यांना आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.