1 Chronicles 5:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले. हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी: रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.