1 Chronicles 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्यांत राहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्यात ते वस्ती करू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.