1 Chronicles 5:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.