1 Chronicles 6:49 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत. परमपवित्रस्थानासंबंधीचे सर्व काम करीत आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करीत. देवाचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.