1 Chronicles 7:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलाह आणि एजेर व एलद; ह्यांना गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यासाठी ते गेले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.