1 Chronicles 7:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला; त्याने त्याचे नाव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.