1 Corinthians 10:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हांला जेवावयास बोलाविले आणि तुम्हांस जावेसे वाटले तर सद्सद्वविवेकबुद्धिने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने स्वीकारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विश्वास न ठेवणार्‍यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले, आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतील ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या गैरविश्वासू व्यक्तीने तुम्हाला भोजनाचे आमंत्रण दिले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर तुमच्यापुढे जे वाढले असेल, ते सदसद्विवेकबुद्धीने प्रश्न न विचारता खावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.