1 Corinthians 10:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर कोणी तुम्हांस सांगितले की, ‘हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,’ तर विवेकबुद्धिसाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेकबुद्धीखातर तो स्वीकारू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सदसद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर कोणी तुम्हास सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकभावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.