1 Corinthians 13:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माइयात प्रीति नसली,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.