1 Corinthians 13:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही. प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.