1 Corinthians 14:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुजनहो, तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी प्रबोधन करण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अपरिचित भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी असावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बंधूंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्वकाही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे.