1 Corinthians 14:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणान्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही सर्वांनी अपरिचित भाषा बोलाव्यात, अशी माझी इच्छा आहे. परंतु विशेषत: तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी मनीषा आहे; कारण ख्रिस्तमंडळीच्या उन्नतीकरिता अपरिचित भाषांचा अर्थ सांगणारा नसेल, तर जो अपरिचित भाषा बोलतो, त्याच्यापेक्षा देवाचा संदेष्टा श्रेष्ठ आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषत: तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्‍यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. यासाठी की, मंडळीची उन्नती व्हावी.