1 Corinthians 14:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन अपरिचित भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्या द्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंधू व भगिनींनो, समजा मी तुमच्याकडे आलो आणि अन्य भाषेत बोलू लागलो, तर तुम्हाला माझा काय फायदा, याउलट मी तुमच्यासाठी काही प्रकटीकरण, किंवा ज्ञान किंवा संदेश दिला किंवा वचनाचा बोध आणला तर चांगले होणार नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?