1 Corinthians 15:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाही तर, जे लोक मरण पावल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात?