1 Corinthians 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्‍या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते.