1 Corinthians 4:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वत:च्या हातांनी काम करतो,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.