1 Corinthians 4:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर प्रभूची इच्छा असली, तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा गर्विष्ठांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.