1 Corinthians 5:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही की, तुम्ही या जगातील जे लोक जारकर्मी, लोभी, फसविणारे किंवा मूर्तिपूजक यांची संगत धरु नये असे नाही. त्याबाबतीत तुम्हांलाच हे जग सोडून द्यावे लागेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि ह्या जगाचे अनैतिक, लोभी, लुटारू व मूर्तिपूजक ह्यांची संगत मूळीच धरू नये, असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे1 व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि जगातले व्यभिचारी, लोभी, लुबाडणारे किंवा मूर्तीपुजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण मग तुम्हास जगातून बाहेर जावे लागेल.