1 Corinthians 5:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहात: बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर पापाचे जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही नवीन बेखमीर गोळ्यासारखे पूर्णपणे शुद्ध व्हावे. माझी खातरी आहे की, तुम्ही खरोखर तसेच आहात; कारण आपला ओलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तुम्ही जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर झाला आहात तसे तुम्ही एक नवीन गोळा व्हावे कारण आपला वल्हांडणाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे.