1 Corinthians 6:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वास्तविक, तुमचे एकमेकांविरुद्ध खटले आहेत यातच तुमचा संपूर्ण पराभव झाला आहे. त्याऐवजी तुम्ही स्वत:वर अन्याय का होऊ देत नाही? त्याऐवजी तुम्ही स्वत:ची लुबाडणूक का होऊ देत नाही?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही एकमेकांवर खटले भरता हे तुमच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा झालेली फसवणूक का सोसून घेत नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही?