1 Corinthians 7:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे.