1 Corinthians 7:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे.