1 Corinthians 7:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता न झालेला असे होऊ नये. कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुंता झालेल्या एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे काय? तर तुम्ही असुंती होऊ नये. तसेच सुंता न होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे का? तर त्याने सुंता करून घेऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुंता झालेली असता कोणाला विश्वासासाठी पाचारण झाले काय? तर त्याने सुंतेचे चिन्ह काढून टाकू नये. बेसुंता असलेल्या कोणाला विश्वासासाठी पाचारण आहे? त्याने सुंता करून घेऊ नये.