1 Corinthians 7:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या आवडीनिवडी विभागल्या जातात. अविवाहित स्त्री वा कुमारिकेचे प्रभूला शरीराने व आत्म्याने संतुष्ट करण्याचे ध्येय असते, परंतु विवाहित स्त्री जगाच्या गोष्टींविषयी व आपल्या पतीला कसे संतोषवावे याकडे लक्ष देते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करते; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करते.