1 Corinthians 7:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु जर कोणाला असे वाटते की, आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे; तो पाप करत नाही; त्यांनी लग्न करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मागणी झालेल्या कुमारिकेशी एखादा मनुष्य आदरपूर्वक वागत नाही असे त्याला वाटले, आणि त्याच्या भावना अतितीव्र आहेत तर त्याने जे योग्य आहे ते करावे. त्यांनी लग्न करावे, केल्यास तो पाप करत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही, त्याने लग्न करून घ्यावे.