1 Corinthians 8:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता, मूर्तिंना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी: आम्हाला माहीत आहे की, “आम्हा सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते. परंतु प्रीति लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी तुम्ही जे लिहिले होते, त्याच्याकडे मी वळतो. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, असे म्हटले जाते, हे खरे आहे. असे ज्ञान अहंकार निर्माण करते परंतु प्रीती प्रगती साधत असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी: “आपल्या सर्वांना ज्ञान आहे” हे आपल्याला ठाऊक आहे. “ज्ञान” फुगवते, प्रीती उन्नत्ती करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.