1 Corinthians 8:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.