1 Corinthians 9:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो खात्रीने आमच्याविषयीच सांगत नाही काय? होय, ते आमच्यासाठीच लिहिले होते, कारण जो नांगरतो त्याने अपेक्षेने नांगरावे. आणि जो मळणी करतो त्याने पिकात वाटा असावा या हेतूने मळणी करावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो हे तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले आहे, अशा अर्थाने की जो नांगरतो, त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो हे सर्वस्वी तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले होते;1 अशा अर्थाने की, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे; आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी.