1 Corinthians 9:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मंदिरात सेवा करणारे मंदिरातल्या उत्पन्नावर आपली उपजीविका चालवतात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?