1 Corinthians 9:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्वत:च्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? द्राक्षमळा लावून द्राक्षे खात नाही असा कोण आहे? किंवा मेढ्यांचे कळप पाळून कळपाचे काही दूध पित नाही असा कोण आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्याच खर्चाने सैन्यात काम करतो, असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध पीत नाही, असा कोण आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करत नाही असा कोण आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?