1 John 1:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे, व त्याची आम्ही साक्ष देतो; ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला कळवतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे आणि त्याचीच साक्ष देतो आणि तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची घोषणा करतो; जे पित्याजवळ होते आणि आमच्यासाठी ते प्रकट झाले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले.