1 John 1:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.