1 John 2:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण तुम्हांला पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. त्याची तुम्हांला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण तुम्ही सशक्त आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते, कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बापांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत. तरुणांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही सशक्त आहात आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते, आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.