1 John 3:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंत:करणाची खात्री पटेल
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपण सत्याचे आहोत, हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि अशा प्रकारे आपण त्याच्यासमोर आत्मविश्वास बाळगू. जर आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, तर आपल्याला ठाऊक आहे की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण सत्याचे आहोत हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वत:ला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्वकाही कळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावरून आपल्याला माहीत होते की, आपण सत्याच्या पक्षाचे आहोत आणि त्याच्या समक्षतेत आपली हृदये विसावतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्यासमोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ,