1 John 4:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्च्त्ति म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.