1 John 4:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.