1 Kings 1:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने अनेक गुरे आणि उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे. त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुळे, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा एकनिष्ठ पुत्र शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने विपुल बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला आणि सर्व राजकुमार, अब्याथार याजक व सेनापती यवाब ह्यांना आमंत्रण केले, पण आपला दास शलमोन ह्याला त्याने आमंत्रण केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोन याला त्याने बोलाविले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.